माय नगर वेब टीम
मुंबई - Sanjay Raut Bail : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना आज अखेर जामीन मिळाला. तब्बल 102 दिवसांनंतर संजय राऊत आज आर्थर रोड जेलबाहेर आले. जेलमधून बाहेर येताच सुटल्याचा आनंद आहे, न्यायालयावर विश्वास वाढला, आम्ही लढणारे आहोत, अशी पहिली प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. तसंच माझी तब्येत बरी नाही, बरं वाटलं की मीडियाशी सविस्तर बोलेने असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांना पत्रावाला चाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांचा अनेकदा जामीन नामंजूर केला होता. तब्बल 102 दिवसांनंतर त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर ते आज जेलमधून बाहेर आले. संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत यांनाही जामीन देण्यात आलाय. संजय राऊतांना 31 जुलैला अटक करण्यात आली होती.
Post a Comment