कुत्र्याने मटण खाल्लं; बापाने मुलीबरोबर केलं धक्कादायक कृत्य



माय नगर वेब टीम

पुणे - धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरुन जन्मदात्या पित्याने पोटच्या मुलीची गोळी झाडून हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आईला अटक करण्यात आली आहे. तर नराधम बाप फरार झाला आहे.


नेमकी घटना काय?

धारशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालक्यातील कार्ला इथली ही घटना आहे. मृत काजल मनोज शिंदे ही तिच्या माहेरी पतीसह आईवडिलांकडेच रहात होती. रविवारी काजलने मटण बनवलं. त्यानंतर ती इतर कामांमध्ये व्यस्त होती. त्याचवेळी घरातल्या कुत्र्याने मटण खालं. हा प्रकार तिच्या आई मीरा हिने पाहिला आणि ती काजलवर संतापली.

या गोष्टीवरुन आई आणि काजलमध्ये जोरदार भांडण झालं. त्याचवेळी दारुच्या नशेत असलेल्या काजलचे वडिल गणेश झंप्या भोसले तिथे आला. त्याने गावठी बंदूकीने काजलवर गोळी झाडली. यात काजोल गंभीर जखमी झाली आणि ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, पण वाटेतच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी नळदूर्ग पोलिसात काजलचे पती मनोज शिंदे यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे वडिल गणेश भोसले आणि आई मीरा भोसले यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. घटना घडल्यानंतर आरोपी गणेश  भोसले फरार झाला असून पोलिसांनी मीरा भोसले हिला अटक केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post