माय नगर वेब टीम
अहमदनगर - शहरातील गायकवाड कॉलनी भागात राहणारे अशोक गायकवाड यांना पोष्टा द्वारे आलेल्य एका पत्र आले असून या पत्रामध्ये अशोक गायकवाड यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. पैसे दिले नाही तर तुझा मुसेवाला करू अशी धमकीही पत्रात देण्यात आली आहे. हे पत्र नीनावी असून याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये अशोक गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे गायकवाड यांना या आधी असेच एक पत्र आले होते तसेच अशोक गायकवाड यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.आणि यानंतर त्यांना धमकी आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
याबाबत अशोक गायकवाड हे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची बुधवारी भेट घेणार असून वारंवार हे प्रकार होत असल्याने याबाबत सखोल चौकशी करण्याचे मागणी ते जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करणार असल्याची माहिती अशोक गायकवाड यांनी दिली आहे.
Post a Comment