पहिलीपासुन हिंदी विषय सक्तीचा करावा; हिंदी भाषा कार्यशाळेत एकमुखी मागणी

 


जिल्हा गुणवंत हिंदी अध्यापकांना पुरस्कार वितरण 


माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदी भाषा प्रेमी असुनही शासनस्तरावर हिंदी भाषेची अवहेलना होत आहे . शालेय स्तरावर हिंदी विषयांच्या तासिका वाढविण्यासाठी संघर्ष करावा लागला .राष्ट्रभाषेचा सन्मान टिकवण्यासाठी पहिली इयत्ता पासुन हिंदी विषय सक्तीचा करावा अशी मागणी हिंदी अध्यापक सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम पगारे यांनी केली .

जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघाच्या वतीने हिंदी शिक्षकांसाठी आयोजित हिंदी भाषा कार्यशाळेत हि करण्यात आली. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभागृहात ही कार्यशाळा घेण्यात आली . यावेळी बालभारतीच्या हिंदी भाषाधिकारी अलका पोतदार , माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडुस, शालेय पाठयपुस्तक मंडळाचे सदस्य प्राचार्य काकासाहेब वाळुंजकर, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक प्रा . भाऊसाहेब कचरे, आप्पासाहेब शिंदे , बाबासाहेब बोडखे , महेंद्र हिंगे , अॅड सुभाष लांडे , नगरसेवक गणेश कवडे आदि यावेळी उपस्थीत होते .

यावेळी पोतदार म्हणाल्या की जगात दोन नंबरची बोलली जाणारी भाषा म्हणुन हिंदी भाषेचा समावेश आहे. विदेशातही हिंदीचा प्रचार -प्रसार होत असल्याने हिंदी भाषा जगात सर्वत्र पोहच झाली आहे . शिक्षणाधिकारी अशोक कडुस यांनी हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे आवाहन शिक्षकांना केले . महाराष्ट्रात हिंदीकडे दुर्लक्ष होत असल्याने आपण केंद्रीय स्तरावर कमी पडतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली .

 यावेळी भाऊसाहेब  कचरे, आप्पासाहेब शिंदे , काकासाहेब वाळुंजकर यांचे भाषण झाले . कार्यक्रमाचे प्रास्तावीक हिंदी अध्यापक सेवा संघाचे सचिव सुरेश गोरे यांनी केले .स्वागत शहर संघाचे अध्यक्ष रविंद्र चोभे यांनी तर सुत्रसंचालन डॉ . निशात शेख यांनी केले .  हिंदी अध्यापक सेवा संघाचे राजाराम टपले रमजान सय्यद एकनाथ जाधव बाळासाहेब नवले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले


हिंदी अध्यापकांना पुरस्कार वितरण

डॉ .निशात शेख , शमशुद्दीन इनामदार , बेबीनंदा लांडे , हबीब शेख , बबन लांडगे , बाळासाहेब घुले , जुबेर सय्यद , भगवान मते , समिना सय्यद , सतीश पंडित , शिवनाथ वेताळ , शारदा बचाटे, सुरेश विधाते , योगेश गुंड , महेंद्र थीटे, दादा गदादे , रविंद्र चोभे ,फयाज शेख , राजू भगत , नारायण झेंडें , शुभांगी पवार, सतीश झांबरे या हिंदी अध्यापकांना गुणवंत हिंदी अध्यापक म्हणुन गौरविण्यात आले .

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post