नगर तालुका पंचायत समितीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर

लहुकुमार चोभे, सुनिल हारदे, संजय ठोंबरे, अविनाश निमसे मानकरी

माय अहमदनगर वेब टीम - 

मराठी पत्रकार दिनानिमित्त येथील नगर तालुका पंचायत समितीच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे पत्रकारिता पुरस्कार या वर्षी दैनिक पुढारीचे लहुकुमार चोभे, दैनिक नवा मराठाचे सुनिल हारदे, दैनिक लोकमतचे संजय ठोंबरे व दैनिक नगरी दवंडीचे अविनाश निमसे यांना जाहीर झाले असल्याची माहिती सभापती सौ. सुरेखाताई संदीप गुंड व उपसभापती डॉ.दिलीप पवार यांनी दिली.

या पुरस्कारांचे वितरण शनिवारी दि.८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता हॉटेल यश पॅलेस येथील सभागृहात  लोकनेते आ. निलेश लंके यांच्या हस्ते व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे यांच्यासह पंचायत समितीचे सर्व सदस्य व तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post