केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लावली साईदरबारी हजेरी

 


शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi


शनिवारी दुपारी प्रवरानगर (Pravaranagar) येथील सहकार परिषद (Co-operative Council) व शेतकरी मेळाव्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनी साईदरबारी हजेरी लावून साईसमाधीचे मनोभावे दर्शन (Sai Darshan) घेतले.


दरम्यान शनिवार दि.18 रोजी दुपारी प्रवरानगर (Pravara Nagar) येथे सहकार परिषद (Co-operative Council) आणी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रवरानगर येथील कार्यक्रम आटोपून ना. शहांचा ताफा सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असलेल्या शिर्डी (Shirdi) येथील जगप्रसिद्ध साईमंदिरात (Sai Temple) दाखल झाला होता. यावेळी त्यांनी साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेत पाद्यपूजा करण्यात आली.


यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister of State for Railways Raosaheb Danve), केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Union Minister of State for Finance Bhagwat Karad), भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), आमदार राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil), साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (CEO Bhagyashree Banayat), उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, संस्थानचे विश्वस्त महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, अँड सुहास आहेर, सचिन गुजर, जयवंतराव जाधव, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ना. अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post