बिग बॉस मराठी थ्री हा रिअॅलिटी शो आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. या घरात जे पंधरा सदस्य होते त्यापैकी आता सात सदस्य राहिले आहेत. उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ, जय दुधाणे, विकास पाटील, विशाल निकम, मीनल शाह आणि सोनाली पाटील असे सात जण आहेत. आज रविवार आहे त्यामुळे या सातजणांपैकी एकाचा किंवा दोघांचा प्रवास आज संपणार आहे. रविवार म्हणजेच एलिमिनेशनचा दिवस आज आहे. शनिवारी महेश मांजरेकरांनी मीनलला म्हणजेच घराच्या कॅप्टनला चांगलंच झापलं आहे. त्यानंतर आज एलिमिनेशन होणार आहे.
हे चार सदस्य झालेत नॉमिनेट
विकास पाटील, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ आणि सोनाली पाटील हे चार सदस्य मागच्या आठवड्यात म्हणजेच सोमवारी नॉमिनेट झाले आहेत. महेश मांजरेकर हे दर आठवड्याला कोणते दोन सदस्य सेफ आहेत ते शनिवारी सांगत असतात. या शनिवारी मात्र तसं घडलेलं नाही. शनिवारी या चारही सदस्यांच्या बॅगा बिग बॉसच्या घराच्या मुख्य दरवाजाबाहेर नेऊन ठेवण्यात आल्या आहेत.
या चारपैकी ज्या एका सदस्याची किंवा दोन सदस्यांची बॅग बाहेर राहिल ते घराबाहेर जाणार आहेत. विकास पाटील, सोनाली पाटील, उत्कर्ष शिंदे आणि मीरा जगन्नाथ या चारही सदस्यांनी शनिवारी त्यांच्या बॅगा बाहेर नेऊन ठेवल्या आहेत. आता आज या चौघांपैकी कोण घराबाहेर जाणार आणि कोण सेफ होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विशाल निकमला तिकिट टू फिनाले
मागच्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून गायत्री दातार बाहेर पडली आहे. त्यानंतर या घरात सातच सदस्य उरले आहेत. त्यापैकी विशाल निकम हा या खेळाच्या फायनलमध्ये जाणारा पहिला सदस्य ठरला आहे. कारण शुक्रवारी जो टास्क पार पडला तो त्याने जिंकला आहे. या आठवड्यात एका व्यक्तीला तिकीट टू फिनाले मिळणार होतं. ती संधी विशालने पटकावली आहे. आपल्या वेगळ्या अंदाजातल्या खेळामुळे विशाल हा पहिल्यापासूनच लोकप्रिय आहे. त्याला घरातल्य काही सदस्यांनी बाजूलाही काढण्याचा प्रयत्न केला. मात्र विशाल स्वतःसाठी फेअर खेळत राहिला त्यामुळे तो तिकिट टू फिनाले मिळवणारा पहिला स्पर्धक ठरला आहे.
बिग बॉसच्या शनिवारच्या एपिसोडमध्ये जी चावडी भरली होती त्या चावडीवर महेश मांजरेकरांनी आज मीनलची चांगलीच शाळा घेतली. मीनलला डोक्यात हवा जाऊ देऊ नकोस म्हणून त्यांनी बजावलं आहे. अशात आज रविवारच्या म्हणजेच आजच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांची अतरंगी डिमांड काय असणार आहे? तसंच चुगली बुथमध्ये कुणाच्या चुगल्या येणार आहेत? हे पाहणंही रंजक ठरणार आहे. मात्र महत्त्वाचं ठरणार आहे ते हे की आज सेफ कोण होणार आणि बाहेर कोण पडणार?
Post a Comment