‘ओमिक्रॉन’च्या धास्तीने लसीकरण केंद्रावर गर्दी

 अहमदनगर |

करोनाचा (Corona) नवीन विषाणू ‘ओमिक्रॉन’ च्या (Omicron) संकटामुळे राज्य सरकार (State Government) सतर्क झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावण्यासाठी नागरिकांना लसींच्या (Vaccination) दोन्ही डोसांची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ओस पडलेल्या लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) गर्दी होऊ लागली आहे. ‘ओमिक्रॉन’ च्या (Omicron) धास्तीने पुन्हा लसीकरण केंद्र (Vaccination Center) गजबजून गेली आहेत. रविवारी रात्री जिल्हा प्रशासनाने आदेश जारी करताच सोमवारी सकाळी नगर शहरातील (Nagar City) नागरिकांनी लस घेण्यासाठी केंद्रात गर्दी (Crowd) केली होती. यावेळी रांग पाहिला मिळाली.


करोनाचा धोका टाळण्यासाठी लसीचे (Vaccine) दोन्ही डोस घेण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी जनजागृती केली जात आहे. परंतू, अनेकांनी अद्यापही लस घेतलेली नाही. प्रशासनाकडून मोठ्याप्रमाणात लसीकरण झालाचा दावा केला जात असला तरी आजही अनेकांनी लस घेतलेली नाही, हे वास्तव आहे. मात्र करोनाच्या ‘ओमिक्रॉन’ विषाणूने (Omicron’ virus) जगभरात धुमाकूळ घातला आहे. याच धास्तीने नागरिकांनी लस घेण्यासाठी तयारी दाखविली आहे. तसेच सरकारने सार्वजनिक ठिकाणी लसीकरण सक्तीचे केले आहे. यामुळेही आता लसीकरण केंद्रावर गर्दी (Vaccination Center Crowd) होत आहे. सोमवारी नगर शहरातील माळीवाडा केंद्रावर गर्दी होती.


चर्चेला उधाण


करोनाच्या दुसर्‍या लाटेने नागरिकांमध्ये मोठी खबराट निर्माण केली होती. आताच कुठे करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच करोनाच्या नवीन विषाणूने नागरिकांची धाकधूक पुन्हा वाढवली आहे. व्यापारी, नागरिक, विद्यालय युवक-युवती मध्ये चर्चा सुरू झाली आहे. आता पुन्हा लॉकडाऊन लागेल की काय याची चिंता सुरू झाली आहे. आरोग्य यंत्राना सतर्क झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post