भंडारदरा, मुळा आणि दारणा धरणांच्या पाणलोटात वरूणराजाची पाठ


 भंडारदरा |

जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असताना मात्र नगर जिल्ह्याची (Ahmednagar District) जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा (Bhandardara), मुळा (Mula) तसेच दारणा धरणाच्या पाणलोटात (Darna Dam watershed) पावसाने पाठ फिरविल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

भंडारदरा धरण (Bhandardara Dam) परिसरात काल मंगळवारी दिवसभर पावसाने वाकुल्या दाखविल्या. पाणलोटातही (watershed) हीच स्थिती होती. पाणलोटात (watershed)) काल रात्री अधुनमधून कोसळणार्‍या पावसामुळे मुळा धरणामध्ये नव्याने 150 दशलक्ष घनफूट आवक होऊन मुळा धरणसाठा 19 हजार 200 दशलक्ष घनफूटवर पोहोचला आहे. काल दुपारनंतर पावसाने पुन्हा उघडीप घेतली होती

इतरत्र पावसाचे थैमान सुरू असताना सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आणि गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोटात मात्र रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसाने धरणांच्या साठ्यात वाढ होणे अवघड आहे. काल दिवसभरात पावसाच्या हलक्या सरी अधुनमधून सुरू होत्या. दमदार पाऊस नसल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्यभरात सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी ढगफुटीची प्रचिती आली. नद्या, नाल्यांना पुराचे चित्र होते. परंतु नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या परिसरातील पावसात मात्र दम नव्हता! काल अधुनमधून बुरबूर स्वरुपाचा पाऊस पडत होता. काल मंगळवारी सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत गंगापूर धरणाच्या भिंतीजवळ 9, कश्यपी 2, गौतमीला 2, त्र्यंबकला 2 तर अंबोलीला 5 मिमी पावसाची नोंद झाली. त्या अगोदर काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासांत गंगापूरला 10, कश्यपीला 6, गौतमीला 18 , नाशिकला 12, त्र्यंबकला 18, अंबोलीला 30 मिमी, असा पाऊस नोंदला गेला. या धरणांमध्ये कोणत्याही प्रकारचे नवीन पाणी दाखल झाले नाही. गंगापूर धरणाचा साठा 91.01 टक्क्यांवर स्थिर आहे. 5630 दलघफू क्षमतेच्या या धरणात 5124 दलघफू साठा आहे. कश्यपी 66.36 टक्के, गौतमी गोदावरी 72.91 टक्के.

दारणाच्या पाणलोटात या पेक्षा वेगळी स्थिती नाही. कालही दिवसभर दारणाच्या पाणलोटात पावसाच्या अधुनमधून बुरबूर सुरु होती. नगण्य होता. काल सकाळी मागील संपलेल्या 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 6, भावली 70, इगतपूरी 33 मिमी असा पाऊस झाला. दारणात 90.49 टक्के पाणी साठा आहे. या धरणातुन काल 31 ऑगस्टला सकाळी 6 पर्यंत एकूण जवळपास 3.4 टीएमसी पाण्याचा विसर्ग नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या दिशेने करण्यात आला. दरवर्षीच्या तुलनेत दारणातील विसर्गाचे हे प्रमाण कमीच आहे. भावली 100 टक्के भरले असल्याने या धराणतून 135 क्युसेक ने विसर्ग सुरु आहे. मुकणे 58.17 टक्के, भाम 100 टक्के भरले असल्याने त्यातून 150 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. वालदेवी 100 टक्के भरले असल्याने या धरणातून 65 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. आळंदी 100 टक्के भरले आहे यातून 30 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीतील विसर्ग काल दुपार पर्यंत एक दिवस बंद होता. तो पुन्हा दुपारी 3 वाजता अवघ्या 200 क्युसेकने सुरु केला आहे. या बंधार्‍याच्या पाण्याची पातळी राखण्यासाठी त्यातून हा विसर्ग करण्यात येत आहे. नवीन पाण्याची फारशी या बंधार्‍यात होत नाही. 1 जून ते काल सकाळी 6 पर्यंत या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 5.4 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

काल गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील पाऊस असा- पाऊस मिमी मध्ये- ब्राम्हणगाव 17, कोपरगाव 9, पढेगाव 22, सोमठाणा 6, कोळगाव 8, शिर्डी 4, राहाता 11, रांजणगाव 13, चितळी 11 असा पाऊस नोंदला गेला. काल दिवसभर राहाता तालुक्यातील गावांमध्ये बुरबूर स्वरुपाचा भिज पाऊस सुरु होता. जोरदार पावसाची या तालुक्याला प्रतिक्षा आहे. चार दिवसाच्या पावसाच्या अंदाजातील दोन दिवस गेले आहेत. उर्वरित दोन दिवसात जोरदार पाऊस पडावा अशी शेतकर्‍यांना आस लागुन आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post