काय सांगता! पुणे मेट्रोतून चक्क सायकल घेऊन प्रवास करण्याची मुभा पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोला हिरवा कंदिल दाखवत मेट्रोची पहिली अधिकृत ट्रायल रन व्यवस्थित पार पाडली होती. बहूप्रतिक्षेत पुणे मेट्रो डिसेंबर पुर्वी प्रवासाच्या सेवेेत दाखल होणार आहे. शिवाय यासाठीचे तिकीट दर हे दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर असतील. त्याचबरोबर पुणे मेट्रोत प्रवाशांना चक्क सायकलही घेऊन जाण्याची मुभा असेल, असं पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षितांनी जाहिर केलं आहे.

डिसेंबर महिन्यापूर्वी पिंपरी महानगरपालिका ते फुगेवाडी असा सात किलोमीटर तर कोथरूड ते गरवारे महाविद्यालय पाच किलोमीटरचा प्रवास प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. पहिल्या एक किलोमीटरसाठी प्रवाशांसाठी दहा रूपये दर आकारण्यात येतील. पुढे हा प्रवास जसा वाढत जाईल तसा दर ही कमी होत जाईल. तेव्हा या तिकीट दराने प्रवास करण्याची संधी प्रवाशांना लवकरात लवकर उपलब्ध होणार असल्याचं दीक्षितांनी सांगितलं आहे.

प्रवाशांना थेट सायकल घेऊन मेट्रोत प्रवास करता येणार आहे. त्यासाठी वेगळं तिकीट काढण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे पुण्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बाब ठरली आहे.

पिंपरी ते स्वारगेट मार्गावर मेट्रोची ट्रायल रन पार पाडली होती. यावेळी सायकल घेऊन प्रवासी कसं प्रवास करू शकतात. याचं प्रात्यक्षिक ही मेट्रोने करून दाखवलं. सुरूवातीला पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा दोन मार्गावर पुणे मेट्रो धावणार आहे. यापैकी वनाज ते रामवाडी या मार्गावर अजित पवारांनी हिरवा कंदिल या अगोदर दाखवला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post