“मी जर गॅंगस्टर होतो तर शिवसेनेने मला मुख्यमंत्री का केलं होतं” मुंबई | शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद सध्या वाढतच चाललेला दिसत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे हे एखाद्या छपरी गॅंगस्टारसारखे वागत-बोलत असल्याचा उल्लेख सामनातील अग्रलेखातून केला. .याच पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर बोलताना, मी जर गॅंगस्टर होतो, तर शिवसेना पक्षाने मला मुख्यमंत्री का केलं?, असा सवाल नारायण राणेंनी राऊतांना केला. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या काळात गंगेचा प्रवाह निर्माण केला होता. त्यावेळी नारायण राणेंसारख्या अनेकांना शुद्ध करून शिवसेनेत घेतलं होतं. तेव्हा राणेंना शिवसेनेने महाराष्ट्राचा़ मुख्यमंत्री केलं होतं, असं संजय राऊत म्हणाले होते.

दरम्यान,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात नारायण राणेंना केंद्रात सुक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग खातं दिलं आहे. त्यांनी केंद्रात व्यवस्थित काम करायला हवं.  परंतु ते महाराष्ट्रात येऊन बेताल वक्तव्य करत असतील तर त्याला शिवसेना उत्तर देणारच, असा इशाराही राऊत यांनी राणेंना दिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post