माय वेब टीम
अहमदनगर | राज्यात गेल्या दीड वर्षापासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद (School closed due to corona outbreak) आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. परंतु, पुन्हा रुग्ण संख्या वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्या. मात्र आता परिस्थिती हळूहळू सुरळीत होत असल्याने करोना मुक्त (Covid 19 free) गावातील शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली (The government allowed the school to start) आहे. त्यामुळे गुरूवारपासून करोनामुक्त असलेल्या गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले. नगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) 133 शाळांचा समावेश आहे.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रत्यक्षपणे शाळा भरलेली नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये. यासाठी ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहेत. परंतु शाळा बंद असल्याने होणारे परिणाम पाहता. वाढते बालविवाह, बालमजुरी, मानसिक ताणतणाव आणि शाळेबद्दल गोडी न राहणे या तक्रारी येत आहे. यामुळे जी गावे करोनामुक्त आहेत. अथवा जिथे मागील तीस दिवसात एकही करोना बाधित आढळून आलेला नाही. अशा गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता.
त्यानुसार कोविड 19 (Covid 19) चे सर्व नियम पाळत काल विद्यार्थ्यांना थर्मल गनद्वारे तपासणी करून आणि सॅनिटायझर (Sanitizer) लावून प्रवेश देण्यात आला. विद्यार्थी संख्या पहिल्या दिवशी कमी असली तरी पालकांनी शाळेत येणासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान, मुलांमध्ये उत्साह असल्याचे शिक्षकांनी सांगितले. तर शाळेतील शिक्षण लवकर समजत असल्याचे विद्यार्थांनी सांगितले आहे. जिल्ह्यात साडे आठेच्या वर करोनामुक्त झालेली गावे आहेत. मात्र, मागील महिनाभरात एकाचा एकही रुग्ण सापडलेल्या गावात या शाळा सुरू करण्यात सांगण्यात आल्याने सुरू होणार्या शाळांच्या संख्येत घट येतांना दिसत आहे.
जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या 1 हजार 210 आठवी ते बारावीच्या शाळा आहेत. यातील 133 गावात गुरूवारी शाळा सुरू झाल्या आहेत. यात सर्वाधिक शाळा हा आदिवासी भाग असणार्या अकोले तालुक्यात 45 आहेत. तर कर्जत तालुक्यात काल एकही शाळा सुरू होवू शकली नाही.
तालुकानिहाय सुरू झालेल्या शाळा
अकोले 45, संगमनेर 21, कोपरगाव 1, राहाता 19, राहुरी 5, श्रीरामपूर 2, नेवासा 11, शेवगाव 4, पाथर्डी 11, कर्जत 0, जामखेड 1, श्रीगोंदा 4, पारनेर 2, नगर शहर 7 अशा 133 शाळांचा समावेश होणार आहे.
Post a Comment