ICC WTC Final 2021: भारतासाठी ‘अनलकी’ ठरलेल्या ‘या’ पंचाची अंतिम सामन्यासाठी निवड

 


माय अहमदनगर वेब टीम

लंडन - इंग्लंडमधील साऊथॅम्प्टनच्या एजस बाऊल मैदानावर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिचा अंतिम सामना रंगणार आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या सामन्यातील मॅच रेफरी आणि इतर पंचांची नावे मंगळवारी जाहीर केली आहेत. रिचर्ड केटलबरो हे टीव्ही पंच, तर अ‍ॅलेक्स व्हार्फ हे चौथे पंच असतील. अशी चर्चा रंगली आहे की, केटलबरो हे आयसीसीच्या बाद फेरीत भारतीय संघासाठी अनेकदा अनलकी ठरले आहेत. आता न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामन्यात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत-न्यूझीलंड संघात १८-२२ जून दरम्यान खेळला जाणार आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वात किवी संघाने २ जूनपासून इंग्लंड विरुद्ध २ सामन्यांच्या कसोटी सामन्यांची सुरुवात केली आहे तर न्यूझीलंड विरोधात फायनल सामन्यांनंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळेल.



 

साऊथॅम्प्टन येथे होऊ घातलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. आयसीसीने मंगळवारी अंतिम सामन्यातील मॅच रेफरी आणि इतर पंचांची नावे जाहीर केली. क्रिस ब्रॉड मॅच रेफरी असतील तर आयसीसी एलिट पॅनेलमधील रिचर्ड इलिंगवर्थ आणि माइकल गफ मैदानावरील पंच असणार आहेत. रिचर्ड केटलबरो टीव्ही अंपायर असतील, तर अ‍ॅलेक्स व्हार्फ हे चौथे पंच असतील. 


दरम्यान, पंच केटलबरो हे आयसीसीच्या बाद फेरीत भारतीय संघासाठी अनेकदा अनलकी ठरल्याची चर्चा क्रिकेट वर्तृळात रंगली आहे. अनेक चाहत्यांना रिचर्ड केटलबरो सामील असलेल्या आयसीसीच्या बाद फेरीतील सामन्यादरम्यान कुप्रसिद्ध घटनांबद्दल माहिती असेल. 


केटलबरो जेव्हा-जेव्हा बाद फेरीत पंचगीरी करतात तेव्हा भारताला पराभवाचा सामना करावा लागतो. अशी चर्चा आहे. भारतीय संघाच्या जवळपास सर्व आयसीसी बाद फेरीतील सामन्यांत केटलबरो यांनी पंच म्हणून कामगिरी पार पाडली आहे आणि निराशाजनक म्हणजे सर्व सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करवा लागला आहे. मात्र, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिच्या अंतिम सामन्यात ते तिसरे पंच म्हणून काम पाहती. आणि हीच बाब भारतीय संघासाठी दिलासा देणारी आहे. 


केटलबरो टीम इंडियासाठी ‘अनलकी’ ठरल्याची काही उदाहरणे...


१. भारताचा श्रीलंकेविरुद्ध २०१४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव 


२. भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१५ आयसीसी विश्वचषक उपांत्य सामन्यात पराभूत


३. भारताचा २०१६ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीजकडून पराभव 


४. भारताचा पाकिस्तान विरुद्ध २०१७ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पराभव 


५. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा पराभव

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post