पीठ मळताना ही ट्रीक नक्की वापरा, पोळी फुलल्याशिवाय राहणार नाही


माय वेब टीम 

हेल्थ डेस्क - भारतीय लोकांचे जेवण हे पोळी किंवा फुलक्यांशिवाय पूर्ण होत नाही. प्रत्येकाला फुललेली आणि गरम पोळी खायला आणि बनवायला आवडते. जेव्हा पोळी गोल येते आणि छान फुलते तेव्हा बनवणाऱ्याला आणि खाणाऱ्यालाही आनंद होतो. परंतु अनेक लोक पोळीसाठी पीठ मळताना अशी एक चूक करतात, ज्यामुळे आपली पोळी फुलत नाही आणि काही वेळात पापडासारखी कडक होते. आज आपण नरम आणि फुलणारी चपाती कशी बनवायची ते जाणून घेऊया…

– पोळी, पुरी किंवा पराठा बनवण्यासाठी तुम्हाला पीठ मळणे सगळ्यात महत्वाचे आहे. बऱ्याच लोकांना हे काम कंटाळवाणे वाटते, परंतु स्वयंपाक घरातील हे सर्वात महत्वाचे काम आहे.

– पीठ मळायला जास्त वेळ जाऊ शकतो, परंतु पटापट पीठ मळल्याने आपल्या पोळीची चव खराब होऊ शकते, म्हणून ५ ते १० मिनिटे पीठ मळा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post