तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा


माय वेब टीम

 मुंबई -दोन्ही लाटेंचा तुलनात्मक विचार करता पुढच्या लाटेत बाधितांचा वयोगट उतरताना दिसून येत आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आत्तापासूनच जागरूक राहत कोव्हिड आरोग्य सुविधा व अनुषांगिक बाबींच्या पूर्ततेकडे काटेकोर लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले.

सध्या कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरताना दिसत असली तरी ही लाट उच्च पातळीवर असताना एका दिवसातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ हजारपर्यंत पोहोचल्याचे निदर्शनास आले होते. इतर देशांतील तिसऱ्या लाटेचा अभ्यास करता त्यामध्ये साधारणत: दुपटीने वाढ होईल, अशी शक्यता लक्षात घेऊन त्या प्रमाणात आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याचे लक्ष्य नजरेसमोर ठेवण्यात आले आहे व तशाप्रकारे तयारी करण्यात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post