माय वेब टीम
मुंबई - राम जन्मभूमी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणी आता राजकारण तापू लागले आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणी शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. ‘जय भवानी, जय शिवाजी, टाक खंडणी… बोलून पैसे जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये… लायकीत राहावे’, असा टोला त्यांनी टि्वटरच्या माध्यमातून हाणला आहे.
जय भवानी,
जय शिवाजी,
टाक खंडणी..
बोलून पैसे जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये..
लायकीत राहावे!!
>दरम्यान, राम मंदिरासाठी लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने देणग्या दिल्या आहेत. त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जात आहे. शिवसेनेला जर त्यावर विश्वास नसेल, तर त्यांनी दिलेले १ कोटी परत मागावेत. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंिदर निर्माण सुरू नाही. शिवसेनेने आता हजरत टिपूचा विचार करावा, राम मंिदराचा विचार करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू समाज सक्षम आहे, अशी जळजळीत प्रतिकि्रया भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे.
राम मंिदर न्यासावर जर गैरव्यवहाराचे आरोप होत असतील, तर त्याचे स्पष्टीकरण राम जन्मभूमी न्यास आणि इतर नेत्यांनी दिले पािहजे. तसेच सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आिदत्यनाथ यांनी त्यावर बोलले पािहजे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे लक्ष दिले पािहजे, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्याला भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Post a Comment