मुंबई हायकोर्टाचा कंगनाला दणका...माय वेब टीम 

मुंबई -अभिनेत्री कंगना राणावतला मुंबई हायकोर्टाकडून अद्याप कोणत्याही प्रकराचा दिलासा मिळालेला नाही. कंगनाने मुंबई हायकोर्टात पासपोर्ट नूतनीकरणासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र सुनावणी दरम्यान कंगनाला दिलासा मिळालेला नाही.

येत्या २५ जूनला या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे. कंगनावर वांद्रे पोलीस स्थानकात देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याने तिच्या पासपोर्ट नूतनीकरणासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. कंगनाला तिच्या ‘धाकड’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी हंगेरी या देशात जायचे आहे. मात्र कंगनाचा पासपोर्ट १५ सप्टेंबरपर्यंतच वैध असल्याने तिला पासपोर्टचे तातडीने नूतनीकरण करणे गरजेचं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post