अवकाळी पाऊस; पिकांचे नुकसानमाय अहमदनगर वेब टीम

सातारा - साताऱ्यात आज(गुरुवार) दुपारी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. मागील दोन दिवसांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाल्याने पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. तसेच, सर्वत्र धुक्यांसह ढगाळ वातावरण आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. स्ट्रॉबेरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी अधिकच अडचणीत आले आहेत. याशिवाय आंब्याचा मोहरही झडल्याचे दिसत आहे.

साताऱ्यात मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अनेक भागात सूर्यप्रकाशही नाही. दरम्यान आज दुपारी जोरदार अवकाळी पाऊस झाला. यापावसाने शेतातील ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. माण तालुक्यातील म्हसवड, खटाव, सातारा, महाबळेश्वर, वाई कोरेगाव तालुक्याही पावसाचा शिडकाव झाला. ढगाळ वातावरण व हलका पावसामुळे शेतातील कामे ठप्प झाली आहेत. तर, अनेक ठिकाणी वाऱ्यासह दमदार पाऊस झाल्याने पिकं आडवी झाली आहेत. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्याचा रब्बी हंगाम प्रमुख असल्याने या तालुक्यात पेरणीही मोठ्या प्रमाणात झाली होती. पिकांची अवस्था चांगली असतानाच पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान होणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post