जिल्हा बँकेकडून 286 कोटींचा शेतकऱ्यांना आधारमाय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर :- केंद्र शासन व नाबाई यांच्या सुचनेनुसार अहमदनगर जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी नविन खेळतेभांडवल (कॅश क्रेडीट) योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्याचा निर्णय अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेच्या संचालक मंडळात घेण्यात आला होता. सदरहू योजना आपल्या जिल्हयात प्रथमच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राबवत असुन दि.७ जुलै २०२० च्या सभेमध्ये पशुपालनसाठी (गाय/म्हैस) कर्ज मर्यादा ठरवून जिल्हयातील शेतकऱ्यांना बँकेने खेळते भांडवल स्वरूपात मोठया प्रमाणावर कर्ज वाटप केले असुन आज अखेर जिल्हयातील ४४६५४ शेतकऱ्यांना रक्कम रू.२८६ कोटीचे कर्ज वाटप केले असल्याची माहीती बँकेचे चेअरमन श्री.सिताराम पाटील गायकर, व्हाईस चेअरमन श्री.रामदास वाघ व राज्याचे माजी मंत्री व बँकेचे ज्येष्ट संचालक श्री.शिवाजी कर्डीले यांनी दिली.


नाबार्डने कळविले नुसार सन २०२०-२१ सालाकरीता खेळते भांडवल कर्ज योजनेची कालावधी १ एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षासाठीच लागू असुन शेतकऱ्यांनी सदर कर्जाची परतफेड ही ३१ मार्च २०२१ पर्यंत करावयाची असुन या योजनेचा व्याजदर कर्जदार सभासदास रू.७.०० टक्के दराने पडणार आहे. खेळते भांडवल व पिक कर्जासहीत रू.३ लाखापर्यंतच्या कर्जास व्याज अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असुन सदरहू कर्ज वेळेत भरल्यास हे ३℅व्याज अनुदान प्राप्त होवु शकते. नाबार्डने चालु केलेली ही नविन योजना राबवित असतांना जिल्हयात मोठया प्रमाणात कर्जमाफी आल्याने तसेच जिल्हा बँकेच्या पिक कर्जासाठी जिल्हयात नविन क.म. मंजुरी साठी प्रा.सेवा सह.संस्था पातळीवर मोठया प्रमाणात कामकाज चालु होते तसेच जिल्हयात कोराना संसर्गजन्य रोगाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने या नविन सुरू झालेल्या खेळत्या भांडवली योजनेचे क.म.करण्यास संस्था पातळीयर विलंब झाला. खेळते भांडवली कर्ज योजना ही कॅश क्रेडीटचा प्रकार असल्याने त्याची परतफेडीची मुदत ही ३१ मार्च असते चालु वर्षात योजना उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये कर्ज परतफेड करावी लागत आहे. परंतु ही अडचण चालु वर्षापुरतीच असुन पुढील वर्षी खेळते भांडवल योजना नियमीतपणे होईल. अशीही माहीती चेअरमन श्री.सिताराम पाटील गायकर, व्हाईस चेअरमन श्री.रामदास वाघ व राज्याचे माजी मंत्री व बँकेचे ज्येष्ट संचालक श्री.शिवाजीराव कर्डीले यांनी दिली असुन जिल्हयातील प्रा.वि.का.सेवा सह.संस्थामार्फत खेळते भांडवल कर्ज योजनेअंतर्गत बँकेच्या धोरणानुसार आलेले सर्व प्रस्ताव मंजुर करण्यात आले असुन जिल्हयात या योजनेत बैकेने मोठया प्रमाणावर कर्ज वाटप करून पशुपालन (गाय/म्हैस) करीता खेळते भागभांडवल उपलब्ध करण्यात आले आहे. तथापी नाबार्डच्या नविन सुचना व बँकेच्या तत्कालीन परिस्थित हे कर्ज भरण्यास सभासद शेतकऱ्यांना मुदत वाढ देण्या बाबत बँक विचार करील अशी माहिती श्री. गायकर, श्री. वाघ, श्री. कर्डीले यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post