धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीची सापडली डेडबॉडी

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - बिग बॉसमधील माजी स्पर्धक आणि कन्नड अभिनेत्री जयश्री रमैया सोमवारी दुपारी मृतावस्थेत सापडली. बंगळुरुतील वृद्धाश्रमात तिचा मृतदेह आढळला. हे आत्महत्येचे प्रकरण असण्याची दाट शक्यता आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून जयश्री नैराश्याचा सामना करत होती. तिने तिच्या सोशल मीडिया पेजवरुन जीवन संपवण्याचेही संकेत दिले होते.बिग बॉस कन्नडच्या तिसऱ्या सीझनमधून तिला प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूने कन्नड चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे. तिचे अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरुन जयश्रीला श्रद्धांजली वाहिली.


मागच्यावर्षी २०२० मध्ये नैराश्याचा सामना करत असल्याचे तिने सांगितले. २२ जूनला जयश्रीने तिच्या फेसबुकवर आपल्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचे लिहिले होते. ‘गुडबाय’ असे तिने एफबी पोस्टमध्ये म्हटले होते. पण नंतर तिने ती पोस्ट डिलीट केली व ‘मी व्यवस्थित आणि सुरक्षित आहे. लव्ह यू ऑल’ असे लिहिले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post