कुख्यात गुंड बंटी राऊत एक वर्षासाठी स्थानबद्ध


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : बंटी उर्फ भावेश राऊत याला एम.पी.डी.ए कायद्या नुसार एक वर्षासाठी तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.   जिल्हादंडाधिकारी राजेंद्र भोसले आणि अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी  संघटीत गुन्हे करणार्‍या विरुध्द एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्याचे दिलेल्या संकेतानूसार महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधिद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळु तस्कर व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम सन १९८१  चे कायद्या अंतर्गत बंटी उर्फ भावेश राऊत कुख्यात गुन्हेगारला १ वर्षाकरीता स्थानबध्द (अटक) करण्यात आले  आहे.

मिळालेली माहिती नुसार पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी नगर जिल्ह्यातील वाळू तस्कर, तसेच धोकादायक व्यक्ती अवैध धंदे करणारे व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांचे विरुध्द कडक कारवाई करण्याचे संकेत दिलेले होते. त्या अनुषंगाने धोकादायक व्यक्ती इसम नामे बंटी उर्फ भावेश अशोक राऊत वय-२९ वर्षे, रा. लाटेगल्ली, माणिकचौक, ता.जि. अहमदनगर यांचे विरुध्द एमपीडीए कायद्यांतर्गत कोतवाली पोलीस स्टेशन यांनी पाठविलेल्या प्रस्तावावर मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी अंतीम निर्णय घेवून बंटी यास आज पासुन एक वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारित केले आहेत.

भावेश अशोक राऊत यांस मा. पोलीस अधिक्षक श्री. मनोज पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली  सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. पोलीस निरीक्षक अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर, यांच्या पथकांतील अधिकारी व कर्मचारी यांनी ताब्यात घेवून आज पासून एक वर्षाकरीता नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द (अटक) करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post