मुंबई: सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग; बाजूच्या इमारतींमध्ये घबराट

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई:मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉल मध्ये भीषण आग लागली असून या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. आग लागली तेव्हा काही जण मॉलमध्ये होते. प्रसंगावधान राखत त्या सर्वांना सुखरूपपणे मॉलबाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

सिटी सेंटर मॉलला लागूनच काही इमारती असून आगीच्या घटनेने येथील सर्वच रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. रात्रीची वेळ असल्याने व आग पसरण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन या इमारतींमधील रहिवाशी घर सोडून बाहेर आले आहेत. आगीबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. 'लेवल-३'ची आग असल्याचे जाहीर करण्यात आले असून अग्निशमन दल ८ फायर इंजिनच्या साह्याने आग आटोक्यात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post