कोरोना संकटात प्रथमच राज्याला आतापर्यंतची प्रथमच positive बातमी!

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरु असतानाच काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या तीन आठवड्यांचा विचार केल्यास राज्यात अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्ये ७ टक्क्यांची घट. झाली आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी याबाबत माहिती दिली आहे. आतापर्यंत देशात ४ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 


देशात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. घरोघरी जावून नागरिकांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. जगात सर्वात जास्त चाचण्या करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. मागील २४ तासात कोविड १९ साठी विक्रमी ११.७२ लाख चाचण्या करण्यात आल्या. देशात कोरोनाच्या संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्या ॲक्टीव्ह रुग्णांपेक्षा साडेतीन टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशीही माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव रोजेश भूषण यांनी दिली. 


पाच राज्यात ६२ टक्के ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यात प्रथमस्थानी महाराष्ट्र (२४.७७ टक्के) तर दुस-यास्थनी आंध्र देश (१२.६४ टक्के) आहे. ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत कर्नाटक तिस-या, तमिळनाडू चौथ्या, व उत्तर प्रदेश राज्य पाचव्या स्थानी आहे. 


महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यात सगळ्यात जास्त कोरोनाने मृत्यू झाले आहेत. एकुण मृत्यूपैकी ७० टक्के मृत्यू या पाच राज्यातील आहेत.  मी मानते की कोही राज्य आपल्या क्षमतेपेक्षा कमी RT- PCR चाचणी करत आहेत. आम्ही त्यांच्याशी संपर्क करुन त्यांना चाचण्या वाढवण्याच्या सूचना देत आहोत, अशी माहिती आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. 


काही राज्यात हेल्थ केअर वर्कर्स जास्त संक्रमित होत आहेत. यात तेलंगणामध्ये १८ टक्के, दिल्ली १४ टक्के, महाराष्ट्रामध्ये १६ टक्के, पंजाब ११ टक्के, कर्नाटक १३ टक्के, पड्डुचेरीमध्ये १२ टक्के हेल्थ वर्कर्स पॉझिटिव्ह आढळले आहेत. या राज्यांना हॉस्पिटलमध्ये प्रोटोकॉल आणि एसओपीचे पालन होत आहे का याकडे लक्ष देण्यास सांगिल्याचेही आरोग्य सचिवांनी भूषण म्हणाले.


आरोग्य मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत म्हणजेच एका दिवसात ८३,८८३ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. बुधवारी २ सप्टेंबर रोजी एकूण ११,७२,१७९ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. २ सप्टेंबरपर्यंत एकूण तपासणीची संख्या ४,५५,०९,३८० वर पोहोचली आहे.


भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) नुसार १ सप्टेंबर रोजी १०,१२,३६७ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. एकूण चाचणीचा आकडा ४,४३,३७,२०१ होता. तसेच ३१ ऑगस्ट रोजी १०,१६,९२० नमुने, ३० ऑगस्ट रोजी ८,४६,२७८ नमुने तर २९ ऑगस्ट १०,५५, ०२७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली.


देशात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. गेल्या २४ तासात ८३,८८३ एवढे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.देशातील आकडा ३८ लाखांवर गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.  गेल्या २४ तासात १०४३ लोकांचा विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्याची संख्या ६७,३७६ वर पोहचली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post