दिल्ली भाजपच्या अध्यक्षांना कोरोनाची लागण

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांना कोरोना संसर्ग झाला आहे. स्वतः गुप्ता यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात किरकोळ ताप आल्यानंतर आपण कोरोनाची चाचणी केली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे गुप्ता यांनी सांगितले आहे. 

आपण मागील आठवड्यापासून क्वारंटाईन आहोत, तरीही जर कोणी संपर्कात आले असेल त्यांनी आपली चाचणी करून घ्यावी, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे. दरम्यान दिल्ली भाजप कार्यालयातील 17 लोकांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. चार दिवसांपूर्वी एका शिपायाला कोरोना झाल्याचे निदान झाले होते, यानंतर सर्व स्टाफची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत 17 जणांना कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे. संक्रमित झालेल्या सर्व लोकांना वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्याना देखील आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post