साई मंदिर दर्शनासाठी खुले न झाल्यास झाल्यास न्यायालयात जाणार'

 

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - शिर्डीतील साई मंदिरावरील बंदी उठवत भाविकांसाठी मंदिर दर्शनास खुले करण्याची मागणी अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा कारखाना येथे सपत्निक श्री गणेशाची विधीवत स्थापना केली. यावेळी सुजय विखे यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ तसेच‌ सभासद यावेळी उपस्थित होते.


शिर्डीच‌ं सर्व अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार देशातील तिरुपती, वैष्णोदेवी मंदिर सुरु झाले. शिर्डी संस्थान आर्थिकदृष्ट्या‌ सक्षम आहे. ऑनलाईन दर्शन सुविधा असल्याने मंदिर सुरु करणे सोयीस्कर असून, गर्दी न करता ठराविक संख्येने दर्शन देणे शक्य आहे. सर्व ग्रामस्थांच्यावतीने मंदिर खुले करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. मात्र सप्टेंबरपर्यंत मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा,” इशारा विखे पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे सरकारला दिला.


कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले यात मंदिरांचाही समावेश होता. दरम्यान देशभरात कोरोनाचा ज्या भागात प्रादुर्भाव कमी आहे त्या भागात काही शिथिलता देण्यास सुरू केले. राज्यातील बससेवेला परवाणगी दिली असली तरी खाजगी वाहणांना अद्यापही परवानगी देण्यात आली नाही. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यानी धार्मिक स्थळाना परवाणगीस मान्यता दिली नाही. 


जैन समाजाने पर्युषण काळात मुंबईतील जैन मंदीरे काही काळासाठी सुरू करण्यास परवानगी द्या यासाठी याचिका दाखल केली होती.  यावर जैन समाजास दिलासा देत मुंबईत दोन दिवस जैन मंदिर पर्युषण काळात खबरदारीसह खुले करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post