चंद्रकांत पाटील हे विरोधकांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न करतात


माय अहमदनगर वेब टीम

कोल्हापूर - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे दोन चेहरे आहेत. एक त्यांचा स्वभाव दिसायला मृदू , लोकांना मदत करणारा, विचार न करता मुक्त वक्तव्य करणारा, दिसायलाही प्रांजळ. दुसरा स्वभाव म्हणजे मिळालेल्या सत्ता व संपत्तीतील आपला कोणीही विरोधक मग साधा टिका करणारा असो. त्याचा काटा काढायचा व त्याला जीवनातून उठवण्याचाच प्रयत्न करण्याचा असा आहे, असा गंभीर आरोप ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे. दोन दिवसांपूर्वी पाटील यांनी मुश्रीफ यांना लिहिलेल्या पत्राला उलटटपाली उत्तर मुश्रीफ यांनी दिले आहे.

मी केलेली मदत जाहीर केली तर तुम्ही माझ्या मागे पुन्हा ईडी व इन्कमटॅक्स लावाल...

पत्रात मुश्रीफ यांनी म्हटले की, चंद्रकांतदादांनी मला पाठवलेले परंतु न मिळालेले पत्र प्रसिद्धी माध्यमातून वाचले व मी आश्चर्यचकित झालो. कारण कोरोनासदृश्य संकटकाळामध्ये त्यांनी कोल्हापूरकडे पाठ फिरवली व मदत दिली नाही, असे वक्तव्य अलीकडच्या काळात मी केलेले नाही. त्यामुळे त्यांनी पत्र लिहून कोरोना संकटांमध्ये किती मदत केली ही जाहीर करण्याची संधी मिळावी म्हणून निमित्त आहे, असे वाटते. दादा, गेल्या पाचवर्षांमध्ये तुम्हाला मिळालेली सत्ता व संपत्ती यांचा विचार करता दोन - तीन लाख लोकांना पाच वर्षे तुम्ही मदत कराल याची खात्री मला आहे. मी व माझ्या फौंडेशनने केलेली मदत जाहीर केली तर आपण पुन्हा ईडी, इन्कमटॅक्स माझ्या मागे लावाल. त्यामुळे मी जाहीर करत नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post