केडगाव मोहिनीनगर परिसर कंटेन्मेंट झोन घोषित

 

माय अहमदनगर

वेब टीम

अहमदनगर - महानगरपालिका हददीतील केडगाव भागातील मोहिनीनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणुची बाधा झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत. या क्षेत्रातुन मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामूळे केडगाव भागातील मोहिनीनगर येथील शेषराव पाठक घर, भानुदास तृये घर, कोतकर मळा, मोहिनीनगर जिल्हा परिषद शाळा, सुंबे घर, ताकवणे घर, केंद्रे घर, द्वारकालाई कदम घर, मोरे घर, मोहिनीनगर टॉवरलाईन रस्ता ते शेषराव पाठक घर हे क्षेत्र कंटेनमेंट झोन 

व पुर्वेस देवी मंदीर व परिसर , दक्षिणेस मोहिनीनगर पाण्याची टाकी व परिसर, पश्चिमेस शिक्षक कॉलनी, कायनेटीक कॉलनी, अपर्थनगर, तुबे मळा परिसर, उत्तरेस राशीनमाता मंदिर, देवी रोडचा उत्तर भाग कोतकर मळा परिसर हे क्षेत्र बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

सदर क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी क्षेत्र प्रतिबंधीत करणे, क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व

प्रस्थान प्रतिबंधीत करणे व क्षेत्रातुन वाहनांचे अवागमन प्रतिबंधीत करण्यात आले आहे.  दि.26 ऑगस्ट पर्यंत सदर प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार असल्याचे मनपामार्फत कळवण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post