गटई कामगारांचे वीज बिल माफ करामाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या गटई कामगारांची आर्थिक परिस्थिती बिकट बनून उपासमारी ओढवली असताना मार्च ते जून महिन्याचे वीज बिल माफ करुन त्यांना आधार देण्याची मागणी चर्मकार विकास संघाच्यावतीने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच या मागणीचे निवेदन महावितरण कार्यालयात अधिक्षक अभियंता संतोष सांगळे व कार्यकारी अभियंता प्रकाश जमधाडे यांना देण्यात आले.

यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, बलराज गायकवाड, निलेश आंबेडकर, अर्जुन कांबळे, गाडे महाराज, लता वाघमारे, संतोष वाघमारे, प्रतिज्ञा वाघमारे, आशा गायकवाड, संतोष गाडे आदि उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या कष्टकरी गटई कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कष्टकरी गटई कामगार गोरगरीब व मोलम जुरी करणारा असून, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अशा परिस्थितीत विज बिल सुद्धा अवास्तव आकारण्यात आलेले आहे.

या संकटकाळात गटई कामगारांना विज बिल भरणे अशक्यप्राय आहे. मार्च ते जून या चार महिन्यांचे वीजबिल सरसकट माफ करून हातावर पोट असणार्‍या कष्टकरी गटई कामगारांना न्याय देऊन आधार देण्याची मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post