कंटेंटमेंट झोनमध्ये यापुढे कडक लाॅकडाऊन




माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - शहर व जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पूर्व तयारी म्हणून नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयाच्या नवीन इमारतीत ४०० बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी जादा रुग्ण आढळून येत आहे अशा ठिकाणी कडक लाॅकडाऊन पाळला जाईल, माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.१०) पालकमंत्री भुजबळ यांनी बैठक घेउन शहर व जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. पुढिल काळात बेडची संख्या अधिक लागणार असून मेडिकल कॉलेज ३५०, एसएमबीटी कॉलेज १५० बेड उपलब्ध होऊ शकतात व त्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्याचा येणार सर्व खर्च शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ऑक्सिजन टँकची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ते बसविण्यात येणार असून त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

औषधे व इतर खर्चासाठी सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.कोविड संदर्भात कुठल्याही निधीची कमतरता नाही. तक्रार असल्यास त्याचे निरासन करण्यात येईल. शासनाकडून येणाऱ्या नवीन औषधाचा वापर शासकीय रुग्णालयात प्राधान्याने वापरण्यात येईल. कोविड केअर सेंटर अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात टेस्टिंग लॅब सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत असून लवकरच सुरू होईल.

जास्तीत जास्त टेस्टिंग करून अधिकाधिक रुग्णांचा शोध घेऊन उपचार करण्यात येत आहे. तसेच अतिदक्षता म्हणून जिल्ह्यात आणि शहरात कोमॉर्बिड रुग्णांवर लक्ष ठेऊन त्यांना देखील औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत नाशिकमध्ये मृत्युदर कमी असून त्यात १२ वा क्रमांक असून रीकव्हरी होणाऱ्या रुग्णांमध्ये ५ व्या नंबरवर आहोत. हा आकडा शून्यावर येईपर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा केली जाईल.

ज्या विभागात जास्त रुग्ण आहे त्या भागात लॉकडाऊन कडक स्वरूपात राबविण्यात येईल.अतिरिक्त बिल वसुली करणाऱ्या खाजगी रुगणालायवर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.

शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडे फी बाबत तगादा लावला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी फी बाबत सक्ती करू नये असे आवाहन केले आहे. त्यामुळे खाजगी शाळांनी कोविड च्या काळात सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post