जया बच्चन, ऐश्वर्या बच्चन निगेटिव्हमाय अहमदनगर वेब टीम
सुपरस्टार अमिताभ बच्चन व त्यांचे पुत्र अभिनेते अभिषेक बच्चन यांना करोना संक्रमण झाले आहे. त्यांना साैम्य कराेनाची लक्षण आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. तसेच जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. बच्चन परिवाराचा बंगला आता सॅनेटाईझ करण्यात येणार आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरून कराेना संक्रमीत असल्याची माहिती शनिवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास शेअर केली. त्त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते.लॉकडाऊनच्या काळात, 25 मार्च पासून ते आपल्या बंगल्यातच होते. काही दिवसांपूर्वी कौन बनेगा करोडपती या मालिकेच्या प्रोमोच्या शुटींगसाठी एक टिम त्यांच्या बंगल्यावर आली होती. तेव्हाच ते परिवारा व्यतिरिक्त अन्य जणांच्या संपर्कात आले होते, अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान मागील दहा दिवसांपासून आपल्या संपर्कात आलेल्या लाेकांनी कराेनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन अमिताभ बच्चन यांनी केले आहे. बच्चन यांच्या घरातील इतर लाेकांचीही कराेना चाचणी करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन यांचे मेडीकल बुलेटीन आज नानावटी हाॅस्पिटलकडून जारी करण्यात येणार आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नानावटी हाॅस्पिटलचे डाॅ.अन्सारी यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post