विराटने उघड केले अनुष्काचे त्याच्या जीवनातील स्थान




माय अहमदनगर वेब टीम
टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील गुप्तगूबद्दल मिडीयातून कितीही चर्चा केली जात असली तरी या दोघांनी मात्र त्यासंदर्भात मौन बाळगणचे पसंत केले आहे. स्टार स्पोर्टसवरील एका मुलाखतीत विराटने अनुष्काचे त्याच्या आयुष्यातील स्थान उघड करून प्रेक्षकांना चकीत केले आहे. त्याच्या मुलाखतीचा हा भाग सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

या मुलाखतीत विराट म्हणतो, मी मोहालीत कसोटी मालिका खेळत असताना मला अनुष्का भेटली व ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर असताना मेलबर्नमध्ये मी अनुष्कासह राहिलो होतो. तेव्हाच माझ्या नावाची कप्तान म्हणून घोषणा केली गेली. वास्तविक मोहालीतच मला बीसीसीआयकडून कप्तानीसाठी तयार होण्याचे सांगितले गेले होते व तेव्हा अनुष्कासोबत मी ही गोष्ट शेअर केली होती. कारण तेव्हा मला कप्तानपद दिले जाईल याची अजिबात कल्पना नव्हती व ही आनंदाची गोष्ट ऐकून मला भावना अनावर होत होत्या. मी रडत होतो. तेव्हाही व प्रत्यक्ष घोषणा झाली तेव्हाही म्हणजे माझ्या आयुष्यातील या अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी अनुष्का माझ्यासोबत होती.

२८ वर्षीय कोहली व २९ वर्षीय अनुष्काने अनेक सार्वजनिक कार्यक्रमात यापूर्वीही एकत्र हजेरी लावली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post