महाराष्ट्रातील "या" सहा राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ



माय अहमदनगर वेब टीम
दिल्ली - करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे.


या वेळेस हा शपथविधी सोहळा राज्यसभेत न होता राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालना'मध्ये पार पडला. आज 62 खासदारांचा शपथविधी पार पडला. उर्वरित खासदारांचा शपथविधी अधिवेशनाच्या वेळी पार पडणार आहे.


आज ज्या खासदारांनी शपथ घेतली त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांनी शपथ घेतली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे राजीव सातव.


भाजपचे उदयनराजे भोसले व डाँ. भागवत कराड, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा समावेश आहे.


शरद पवार यांनी हिंदीतून शपथ घेतली तर प्रियंका चतुर्वेदी, राजीव सातव व डॉ. भागवत कराड यांनी मराठीतून शपथ घेतली आहे.


उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली व शपथ घेतल्यानंतर त्यांनी "जय भवानी, जय शिवाजी"ची घोषणा देखील केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post