महापौर बाबासाहेब वाकळे यांचे आयुक्तांना पत्र


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- गेल्या 3-4 महिन्यांपासून महापालिकेची महासभा झालेली नाही. त्यामुळे अनेक प्रकल्प रखडले असून तातडीने महासभा आयोजित करण्याची कार्यवाही करावी, असे पत्र महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आयुक्तांना दिले आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपाकडून व शासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. तरी देखील रूग्णांची संख्या वाढत आहे. यासह मनपाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर तसेच प्रकल्पाबाबत चर्चा होणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसापासून कोरोना प्रादुर्भावामुळे महासभेचे आयोजन करता आले नाही. महासभा घेणे आवश्यक असल्याने येत्या तीन चार दिवसामध्ये महासभेचे आयोजन करावयाचे आहे.

महासभेमध्ये सदस्यांकडून सोशल डिस्टन्सिंग व शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार योग्य ती व्यवस्था करणेबाबत आदेशीत करावे. तरी महासभेचे आयोजन येत्या एक दोन दिवसात करावयाचे असल्याने त्यादृष्टीने शासनाच्या निर्देशानुसार उपाय योजना करणेबाबत नगर सचिव यांना योग्य ते आदेश देण्यात यावेत, असे महापौर वाकळे यांनी म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post