महापालिकेचे काम युनियनकडून बंद
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - एक विभाग प्रमुखासह दोघे करोन बाधित झाल्याने महापालिका कर्मचारी युनियनने आज महापालिकेचे काम बंद पडले. कर्मचाऱयांचे आरोग्य धोक्यात असल्याचे सांगत जो पर्यंत सुरक्षेची पूर्ण व्यवस्था आणि हमी मिळत नाही तोपर्यंत कर्मचारी कामावर येणार नसल्याचे युनियनने सांगितले.
महापालिकेचा एक कर्मचारी अगोदरच बाधित झालेला आहे, त्यात आता एक विभागप्रमुख आणि त्याच विभागातील एक कर्मचाऱ्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
Post a Comment