चार वर्षाच्या चिमुकल्यासह 62 रुग्णांची कोरोनावर मातमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- एका चार वर्षाच्या चिमुकल्यासह जिल्ह्यातील 62 रुग्णांनी बुधवारी (दि.15) कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामध्ये नगर शहरातील 14 जणांचा समावेश आहे. या 62 रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये अकोले येथील 7, नगर तालुक्यातील 8, नगर शहरातील 14, नेवासा 1, पारनेर येथील 4, राहाता येथील 2, संगमनेर येथील 15, शेवगाव येथील 6, श्रीगोंदा येथील 2 आणि श्रीरामपूर येथील 3 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 728 एवढी झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 हजार 84 रुग्ण कोरोनाबाधित आढळलेले असून त्यापैकी 728 बरे झाले आहेत तर 30 जणांचा मृत्यू झालेला आहे. एकूण 327 बाधितांवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले त्यावेळी या चार वर्षाच्या चिमुकल्याला रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी गुलाबपुष्प देवून त्याला पुढील आरोग्यदायी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post