रात्रीच्या वेळी ‘हे’ 5 पदार्थ खाल्यास कधीच कमी होवु शकणार नाही तुमचं वजन, जाणून घ्या



माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - वाढलेलं वजन नियंत्रणात आणण्यासाठी कित्येक जण जिममध्ये तास-न-तास घाम गाळतात. तर काही जण खाण्यापिण्याची सवयी बदलतात. मात्र, जर तुम्ही रात्री काहीही खाल तर तुमचं वजन कमी करण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला हेल्दी आणि बॅलन्स डाएट म्हणजेच आहार घेण्याची गरज आहे. खासकरुन रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही पदार्थ खाणे टाळा, जे वजन वाढण्याला कारणीभूत ठरतात. काही पदार्थ असे असतात जे खाऊन तुमच्या आरोग्याला नुकसान पोहचते आणि वजनही वाढतं. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर खालील पदार्थ रात्री खाणे टाळा.

१. ड्राय फ्रुट्स

काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड हे ड्रायफ्रूट्स आरोग्यसाठी भरपूर फायदेशीर असतात. यामध्ये कॅलरीच प्रमाण अधिक असतं. जेव्हा तुम्ही रात्री याच सेवन करता तेव्हा शरीर ऍक्टिव्ह नसते. शरीरात ऊर्जा निर्माण करण्यात कॅलरीचा फार कमी वापर होतो. त्याने कॅलरी शरीरात फॅटच्या स्वरूपात जमा होत राहते. म्हणून ड्रायफ्रूट्स एकतर सकाळी खावेत नाहीतर दिवसा. रात्री झोपताना शक्यतो खाणे टाळावे.

२. चॉकलेट

चॉकलेट खाण्याचं प्रमाण अलीकडे वाढलं असून त्याचे आरोग्याला अनेक फायदे सुद्धा आहे. चॉकलेट खाल्ल्याने मूड चांगला होतो आणि चॉकलेट हृदय आणि मेंदूसाठी हेल्दी मानलं जात. त्यामध्ये साखर, कॅलरी आणि फॅट अधिक प्रमाणात असता. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी चॉकलेट खाणं टाळलं पाहिजे. खासकरुन ज्याचं वजन जास्त आहे अशा लोकांनी.

३. फ्रुट ज्यूस

बाजारात मिळणारे डबाबंद ज्यूस पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. कारण यामध्ये शुगरचे प्रमाण भरपूर असते. सोबतच कोल्ड ड्रिंक्समध्ये सोडा असतो आणि त्यात शुगरही असते. फायबर आणि पोषक तत्व हे तयार करतानाच निघून बाहेर पडतात. म्हणून ज्यूस पिण्याऐवजी ताजी फळे खाणं अधिक चांगले ठरतं.

४. आइस्क्रीम

वजन कमी करायचं असेल झोपण्यापूर्वी आइस्क्रीमही अजिबात खाऊ नका. यामध्ये फॅट आणि आर्टिफिशियल शुगर अधिक प्रमाणात असते. ज्याने शरीरात कॅलरी इनटेक अधिक होते.

५. पिझ्झा

रात्री पिझ्झा खाऊन झोपत असाल तर तुमचं वजन वाढू शकत. कारण पिझ्झामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरी असते. चीझ, सॉस असलेली शुगर पिझ्झा बेससाठी वापरल्या जाणाऱ्या पिठात रिफायन कार्ब्स असतात. जे वजन वाढण्याला कारणीभूत ठरतात. तसेच नॉनव्हेज पिझ्झामध्ये ट्रान्स फॅट असतात, जे वजन वाढण्याला कारणीभूत ठरतात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post