रात्री सतत लघवीला येण्याची समस्या उद्भवते ; ‘ही’ आहे प्रमुख 4 कारणेमाय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - अनेकजण असे आहेत ज्यांना रात्री सतत लघवीला येण्याचा त्रास असतो. यामुळं अनेकदा झोपही मोड होते. विशेष करून महिलांना हा त्रास जास्त जाणवतो. आज आपण रात्री सतत लघवीला येण्याची काही कारणं जाणून घेणार आहोत.

1) डायबिटीज – जर तुम्हाला डायबिटीज असेल तर यामुळंही सतत लघवीला येते. रक्तात साखरेचं प्रमाण जास्त असल्यानं शरीरात मूत्र तयार होण्याचं प्रमाण वाढतं. यामुळं सतत लघवीला लागण्याचं प्रमाण वाढतं. जर तुम्हाला असा त्रास जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
2) रात्री मद्यापान करणं – झोपण्याच्या आधी मद्यापान किंवा मादक पदार्थांचं सेवन केल्यानंही रात्री सतत लघवीला येते. झोपण्याच्या किमान 3 तास आधी तुम्ही मद्यपान करणं किंवा अशा पदार्थांचं सेवन करणं टाळायला हवं.

3) हार्मोन्सचा अभाव – जर शरीरात अँटीडायुरेटीक हार्मोन्सची कमतरता असेल तरीदेखील ही समस्या उद्भवते. द्रव पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे हार्मोन्स किडनीला मदत करतात. म्हणून जर अशा हार्मोन्सची शरीरात कमतरता निर्माण झाली असेल तर सतत लघवीला येण्याची समस्या येते. म्हणून या समस्येला हलक्यात न घेता डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार घेतले पाहिजेत. असं न केल्यास मोठा आजारही होऊ शकतो.

4) पाण्याचे अतिसेवन – झोपण्यापूर्वी जर तुम्ही जास्त प्रमाणात पाण्याचं सेवन केलं तर मध्यरात्री  तुम्हाला ही समस्या जाणवू शकते. नेमकं पाणी कधी प्यावं हे माहित नसल्यानं असं होतं. झोपण्याच्या किमान 1 तास आधी पाणी पिऊ नये.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post