...त्यामुळे गुगलने तात्काळ हटविले हे 25 अ‍ॅप्स ; तुम्ही व्हा सावध




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - एवढ्यात सातत्याने मोबाईलचा पासवर्ड चोरी झाल्याच्या घटना उघडकीस येत होत्या. प्रामुख्याने भारतात हे जास्त प्रमाणात घडत होतं. अखेरीस गुगलने शोधमोहीम हाती घेऊन तब्बल २५ अ‍ॅप्स प्ले स्टोरवरून हटवले आहेत. एविना नावाच्या सायबर सिक्युरिटी फर्मनं याबद्दल गुगलला सतर्क केलं होतं. त्यानंतर गुगलनं तातडीनं संबंधित अ‍ॅप्स प्ले स्टोरवरून हटवले.

सुरक्षेच्या दृष्टीनं हे अ‍ॅप्स अत्यंत धोकादायक आहेत. हे २५ अ‍ॅप्स जवळपास २० लाख लोकांनी डाऊनलोड केले आहेत. तुमच्या मोबाईलमध्ये यापैकी कोणतेही अ‍ॅप्स असल्यास ते तातडीनं डिलीट करा. तसेच आपल्या जवळच्या लोकांना याबाबत माहिती द्या.

हे आहेत गुगलने प्ले स्टोरवरून हटवलेले अ‍ॅप्स :-
1. सुपर वॉलपेपर्स फ्लॅशलाइट्स (Super Wallpapers Flashlight)- ५ लाख डाऊनलोड
2. पेडेनटेफ (Padenatef)- ५ लाखांहून अधिक डाऊनलोड
3. वॉलपेपर लेवल (Wallpaper Level)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड
4. कॉन्टूर लेवल वॉलपेपर (Contour level wallpaper)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड
5. आयप्लेयर अँड आयवॉलपेपर (Iplayer & iwallpaper)- १ लाखांहून अधिक डाऊनलोड
6. व्हिडियोमेकर (Video maker)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड
7. कलर वॉलपेपर्स (Color Wallpapers)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड
8. पेडोमीटर (Pedometer)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड
9. पावरफुल फ्लॅशलाइट (Powerful Flashlight)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड
10. सुपर ब्राइट फ्लॅशलाइट (Super Bright Flashlight)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड
11. सुपर फ्लॅशलाइट (Super Flashlight)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड
12. सॉलिटायर गेम (Solitaire game)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड
13. एक्युरेट स्कॅनिंग ऑफ क्यूआर कोड (Accurate scanning of QR code)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड
14. क्लासिक कार्ड गेम (Classic card game)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड
15. जंक फाRल क्लीनिंग (Junk file cleaning)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड
16. सिंथेटिक झेड (Synthetic Z)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड
17. फाइल मॅनेजर (File Manager)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड
18. कम्पोझिट झेड (Composite Z)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड
19. स्क्रीनशॉट कॅप्चर (Screenshot capture) - १० हजारांहून अधिक डाऊनलोड
20. डेली होरोस्कोप वॉल पेपर्स (Daily Horoscope Wallpapers)- जवळपास १० हजार डाऊनलोड
21. वॉक्सिया रीडर (Wuxia Reader)- जवळपास १० हजार डाऊनलोड
22. प्लस वेदर (Plus Weather)- जवळपास १० हजार डाऊनलोड
23. एनाइम लाईव्ह वॉलपेपर (Anime Live Wallpaper)- जवळपास १० हजार डाऊनलोड
24. आय हेल्थ स्टेप काऊंटर (iHealth step counter)
25. कॉम टाइप फिक्शन (Com type fiction

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post