झोप येण्यावर काही उपाय आहे?



माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - झोप न येण्याची अनेक कारणे आहेत. रात्रीच्या वेळी योग्य प्रमाणात झोप येणे हे निरोगी राहण्यासाठी आवश्यक असते. झोपेमध्ये शरीराला विश्रांती मिळते. त्यामुळेच आपण ताजेतवाने होतो. शरीराच्या वाढ व विकास यासाठीही झोप आवश्यक असते. लहान बाळे 18 ते 20 तास झोपतात तर प्रौढ 7 ते 8 तास झोपतात. वृद्ध व्यक्ती मात्र 4 ते 5 तासच झोपतात. हे सर्व झाले निरोगी व्यक्तींविषयी. काही व्यक्तींना मात्र काही केल्या झोप येत नाही. झोप न येणार्‍या पत्नीला अॅलोपॅथिक उपचार करून थकलेल्या डॉ. केंट यांना होमिओपॅथीमुळे तिच्या रोगावर उपचार मिळाला आणि तेव्हापासून होमिओपॅथीवर कडक टीका करणारे हे विद्वान डॉक्टर होमिओपॅथीचे अभ्यासक आणि संशोधक बनले.

झोप न येणार्‍या काही मात्र त्रस्त झालेल्या असतात. या निद्रानाशाची कारणे पाहू. दुपारी झोपल्यास रात्री झोप येत नाही. ताप, सर्दी, नाक चोंदणे इत्यादी असेल तरी झोप येत नाही. तंबाखू, सिगरेट या व्यसनांच्या अतिरेकामुळेही झोप येत नाही. बैठे काम, व्यायामाचा अभाव मानसिक अस्वस्थता, चिंता, ताण आदी कारणांमुळेही झोप येत नाही. निद्रानाश जर मानसिक रोगांमुळे असेल, तर त्यासाठी मनोविकार तज्ज्ञांना सल्ला घेणे योग्य राहील. इतरांनी मात्र काही प्रयत्न केल्यास त्यांना नक्कीच चांगली झोप लागेल. अशा व्यक्तींनी दिवसात भरपूर अंगमेहनतीची कामे, व्यायाम करावा. दुपारी किंवा संध्याकाळी कॉफी किंवा कोरा चहा पिऊ नये.

झोपायला जाण्यापूर्वी ग्लासभर गरम दूध किंवा गरम दुधात थोडे मध मिसळून ते प्यावे. झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करावी. योगनिद्रेसारख्या उपायांचाही चांगला उपयोग होतो. स्व-संमोहन पद्धतीचाही झोप येण्यासाठी उपयोग होऊ शकतो, पण यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. एक मात्र खरे की झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नयेत. कारण या गोळ्यांची सवय लागू शकते. त्यामुळे स्वतःच मन खंबीर करून वर सांगितलेले उपाय केल्यास निद्रानाशाचा त्रास कमी होऊ शकेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post