यावर्षी 8व्यांदा ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले


माय अहमदनगर वेब टीम
स्पोर्ट डेस्क - सर्बियाचा टेनिस पटू नोवाक जोकोविचची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याने स्वतः मंगळवारी याबाबत माहिती दिली. वर्ल्ड नंबर-1 जोकोविचने याच महिन्यात कोरोना व्हायरसदरम्यान एग्जीबिशन एड्रिया टूर चॅरिटी टेनिस टूर्नामेंट आयोजित केला होता. टूर्नामेंटमध्ये सामील तीन खेळाडू याआधीच संक्रमित झाले आहेत.
हे खेळाडू बुल्गारियाचा ग्रिगोर दिमित्रोव, क्रोएशियाचा बोर्ना कोरिच आणि सर्बियाचा विक्टर त्रोइकी आहेत. विक्टरच्या गरोदर पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे.
जोकोविचने कोरोना पॉझिटिव्ह दिमित्रोवसोबत बास्केटबॉल खेळला होता
या सर्वासाठी ब्रिटिश प्लेयर डेन इवांसने वर्ल्ड नंबर-1 जोकोविचला जबाबदार ठरवले आहे. मागच्या आठवड्यातच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाली होती. यात दिमित्रोवसोबत जोकोविच, एलेक्जेंडर ज्वेरेव आणि मारिन सिलिच बास्केटबॉल खेळताना दिसले होते.
जोकोविचने 17 ग्रँड स्लॅम जिंकले
जोकोविचने यावर्षीच्या सुरुवातीलाच 8व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन किताब जिंकला होता. त्याने फायनलमध्ये ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थिएमसला 6-4, 4-6, 2-6, 6-3, 6-4 ने पराभूत केले. जोकोविचच्या नावे 17 ग्रँड स्लॅम आहेत. त्याने 8 ऑस्ट्रेलियन ओपन, 5 विंबलडन, 1 फ्रेंच ओपन आणि 3 यूएस ओपन जिंकले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post