'नमस्ते ट्रम्प' इव्हेंटमुळे वाढला कोरोना व्हायरसचा फैलाव
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी घेण्यात आलेल्या नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळेच देशात कोरोना फोफावला असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राउत यांनी रविवारी केलेल्या आरोपांप्रमाणे, फेब्रुवारी महिन्यात ट्रम्प अहमदाबादला आले होते. त्यात ट्रम्प यांच्या प्रतिनिधींनी गुजरात, मुंबई आणि दिल्लीतील विविध ठिकाणी जाऊन मान्यवरांच्या भेटी घेतल्या. एवढेच नव्हे, तर केंद्र सरकारने देशव्यापी लॉकाउन घोषित करत असताना कुठल्याही प्रकारची प्लॅनिंग केली नाही. आता लॉकडाउन उघडताना सुद्धा केंद्राने राज्य सरकारांवर जबाबदारी झटकली आहे असा घणाघात राउत यांनी रविवारी बोलताना केला आहे.
गुजरातमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी एवढ्या लोकांनी गर्दी केली होती. ट्रम्प यांच्यासोबत आलेले प्रतिनिधींचे शिष्टमंडळ अहमदाबाद, मुंबई आणि दिल्लीला गेले. त्यामुळेच देशात कोरोना वाढला असे राऊत म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे, 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या जंगी स्वागतासाठी नमस्ते ट्रम्प कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. मोटेरा क्रिकेट स्टेडिअममध्ये झालेल्या या कार्यक्रमात जवळपास 1 लाख लोक एकवटले होते. यानंतर गुजरातमध्ये 20 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता.
Post a Comment