केडगाव, पारनेर, संगमनेर, कर्जत, राहत्यातील 10 जणांना कोरोनाची लागण


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - आजीसह मुंबईहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेली सहा वर्षीय मुलगी कोरोनाचा लढा यशस्वीपणे लढून आणि त्याच्यावर मात करुन सुखरुप घरी परतली. आज येथील बूथ हॉस्पिटलमधून या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला. याशिवाय, संगमनेर तालुक्यातील निमोण येथील व्यक्तीला आज नाशिक येथून डिस्चार्ज देण्यात आला.

*आज दिवसभरात जिल्ह्यात १० नवीन रुग्ण तर ५७ जणांचे अहवाल निगेटिव्ह*

* कर्जत तालुक्यातील राशीन येथील एकाच कुटुंबातील १२ वर्षीय मुलगा आणि १७ वर्षीय मुलगी असे ०२, बाधीत रुग्णाचे नातेवाईक.

* राहाता तालुक्यातील ममदापूर बाभळेश्वर येथील ३५ वर्षीय पुरुष, बाधीत रुग्णाच्या संपर्कात आला होता.

*संगमनेर तालुक्यातील ०५ यामध्ये कवठे कमळेश्वर येथील ३७ वर्षीय पुरुष, विक्रोळी येथून मालुन्जा संगमनेर येथे आलेली ५२ वर्षीय महिला आणि संगमनेर शहरातील २७ वर्षीय युवक हे मुंबईहून संगमनेर येथे आले. त्यांना सारी (श्र्वसनाचा त्रास) ची लक्षणे. कोरोना अहवालही पॉझिटिव्ह. कोल्हेवाडी रोड संगमनेर येथील २२ व २४ वर्षीय युवक, बाधिताच्या संपर्कातील.

*पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे मुंबईहून आलेली ३६ वर्षीय महिला.

*केडगाव अहमदनगर येथील मुंबई येथे कामाला असलेली २८ वर्षीय महिला.

*जिल्हयातील ऍक्टिव्ह केसेस ५९ (+०२संगमनेर)*

*जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्णसंख्या १४१*

(महानगरपालिका क्षेत्र २३, अहमदनगर जिल्हा ७५, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ३३)

* एकूण स्त्राव तपासणी २४३७

निगेटीव २२०१ रिजेक्टेड ०२५ निष्कर्ष न निघालेले १५ अहवाल बाकी ५५

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post