औरंगाबादसह राज्यातील पाच कारागृहात लॉकडाउनमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - सध्या राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील काही दिवसांपासून देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. यातच आता तुरुंगातील कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी राज्यातील पाच कारागृहांना लॉकडाउन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री
अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली.
याबाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, राज्यातील अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. त्यामुळे आम्ही औरंगाबादसह राज्यातील पाच कारागृहामध्ये लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची राहण्याची आणि खाण्या-पिण्याची सर्व व्यवस्था कारागृहातच केली जाईल. या लॉकडाउनदरम्यान कोणालाच कारागृहात जाता किंवा बाहेर येता येणार नाही.'


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post