जगभरात कोरोनाचे 1 लाख 27 हजारांपेक्षा अधिक बळी, रुग्णसंख्या 20 लाखांवर




माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली – डिसेंबर महिन्याच्या अखेरीस चीनच्या वुहान शहरातून सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूने जगातील अनेक देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 1 लाख 27 हजार 635 लोकांचा बळी गेला आहे.

तर, एकूण 20 लाख 15 हजार 571 जणांना या संसर्गाची लागण झाली आहे. कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिका आणि युरोपियन देशांना बसला आहे.

सध्या अमेरिकेने कोरोनासारख्या महामारीसमोरहात टेकले असल्याचे चित्र आहे अमेरिकेत 6 लाख 14 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, आतापर्यंत अमेरिकेत 26 हजार 64 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

युरोपमध्येही कोरोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. युरोपमध्ये 10 लाख तीन हजार 284 जणांना लागण झाली असून 84 हजार 465 जणांचा मृत्यू झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post