'त्या' प्रकरणाने संसर्ग प्रकरणांची गती जवळपास दुप्पट झाली - आरोग्य मंत्रालय



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - गुजरातच्या जामनगर जिल्ह्यात एका 14 महीन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. त्या बाळाची कोणतीच ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. त्या बाळाला संक्रमण कुठून झाले, याची माहिती आरोग्य विभाग करत आहे. सध्या त्या बाळाला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर दरेड गावाला लॉकडाउन करण्यात आले आहे.
कोरोना संकटाला पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या मंत्रीमंडळातील सर्व मंत्री आणि सर्व खासदारांनी पुढील एक वर्ष आपल्या पगारातील30% भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कॅबिनेटने सोमवारी या संबंधी एक अध्यादेश जारी केला. यासोबतच राष्ट्रपती, उप-राष्ट्रपतीआणि राज्यपालांनीआपल्या सॅलरीमधून30% कपात करण्याचे सांगितले.
यापूर्वी पंतप्रधानांनीसोमवारी कोरोनाच्या उपाययोजनांसाटी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून कॅबिनेटची बैठक घेतली. यात सोशल डिस्टेंसिंगध्यानात घेता गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बैठकीदरम्यान एकमेकांपासून लांब बसलेले पाहायला मिळाले.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 हजार 600झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 120 , आंध्रप्रदेशात 34, गुजरातमध्ये 14, मध्यप्रदेशात 14, हिमाचलमध्ये 7, राजस्थानात 6, पंजाबमध्ये 3, कर्नाटक-ओडिशा मध्ये 2-2 आणि झारखंडमध्ये 1 रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ही आकडेवारी covid19india.org वेबसाइटनुसार आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत संक्रमितांची संख्या 4 हजार 67 झाली आहे. यातील 291 बरे झाले असून 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तबलिगी जमात प्रकरणाने संसर्ग प्रकरणांची गती जवळपास दुप्पट झाली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात तबलिगी जमात प्रकरण उघडकीस आल्यानंतर संसर्ग प्रकरणांची गती जवळपास दुप्पट झाली आहे. मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, तबलिगी जमातीचे प्रकरण झाले नसते तर देशात 7.4 दिवसांत प्रकरणे दुप्पट झाली असती मात्र आता ही संख्या 4.2 दिवसांत दुप्पट होत आहे. ते म्हणाले की, रविवारी देशातील 274 जिल्ह्यांतून कोरोनाचे नवीन प्रकरणे समोर आले होते. बुधवारपासून ज्या ठिकाणी संसर्ग होण्याच्या अधिक घटना घडल्या आहेत त्या ठिकाणी रॅपिड टेस्ट घेण्यात येणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post