कोरोनाने जगभरात आतापर्यंत 64 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू


माय अहमदनगर वेब टीम
वॉशिंग्टन-. जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 12 लाखांवर गेला आहे. तसेच, आतापर्यंत 64 हजार 691 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन लाख 46 हजार रुग्ण ठीक झाले आहेत. अमेरिकेत मागील 24 तासात 1 हजार 224 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, आतापर्यंत 8 हजार 400 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत सर्वात जास्त 3 लाख 11 हजार 357 लो संक्रमित झाले आहेत. देशातील कोरोनाचे एपिसेंटर असलेल्या न्यूयॉर्कमध्ये 24 तासात 630 जणांचा मृत्यू झालाय. देशता एकट्या न्यूयॉर्कमध्ये संक्रमितांचा आकडा 1 लाख 13 हजार 704 झाला आहे, तर न्यूयॉर्क सिटीमध्ये 63 हजार 306 आहेत. अमेरिकेतील संक्रमितांचा आणि मृतांचा आकडा चीनपेक्षा जास्त झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post