... तर 30 एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढवावा लागेल
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिलपर्यंतच लॉकडाऊन वाढवला आहे, परंतु नागरिकांनी लॉकडाऊनला गांभीर्याने घेतले नाही तर कदाचित ३० एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिले. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळून कर्मचाऱ्यांना राहण्याच्या व्यवस्था करणाऱ्या कंपन्या सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सूचित केल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्यातील रुग्णालयांची आता तीन विभागात वर्गवारी करण्यात येणार असून त्यानुसार व्यवस्था केली जाणार आहे. तसेच रॅपिड टेस्टनंतर आता पूल टेस्टिंगचा वापरही केला जाईल. राज्यात मुबलक प्रमाणात वैद्यकीय सुरक्षा साहित्याचा साठा आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढवण्यात येणार असून कोणताही कोरोना संशयित यातून सुटता कामा नये असा आमचा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.
Post a Comment