अहमदनगरकरांना कोरोनापाठोपाठ 'सारी'चा धोका ; सारी रुग्णाची संख्या ४२ वर


जिल्ह्यातील २१ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह; ३३ अहवालाची प्रतीक्षा

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी २१ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
दरम्यान, काल पाठवलेले १३ आणि आज पाठविण्यात आलेले २० असे ३३ स्त्राव अहवालाची अद्याप प्रतीक्षा असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १२१५ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ११४५ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव आले आहेत. ज्या अहवालाची प्रतीक्षा आहे त्यामध्ये १४ दिवस पूर्ण केलेल्या आणखी दोघा परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सारीचे रुग्णही आढळत असून ११ एप्रिलपासून ते आजपर्यंत ४२ रूग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि महात्मा फुले जीवनदायी योजने अंतर्गत मान्यता दिलेल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये २३ पुरुष, १५ स्त्री आणि ०४ मुलांचा समावेश आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post