जिल्ह्यातील सर्व भाजीपाला बाजार ३१ मार्चपर्यंत बंद ; फेरीद्वारे विक्रीस परवानगी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अहमदनगर जिल्हयातील सर्व भाजीपाला बाजार दिनांक 31 मार्चपर्यंत भरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले असून भाजीपाला विक्री करणारे लोकांना फेरीव्दारे किंवा एखादया ठिकाणी बसून (फक्त एकाच भाजीपाला विक्रेत्यास गर्दी टाळून) परवानगी राहील. या आदेशाची आजपासूनच तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत.

कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना घोषीत करण्यात आलेले आहेत. त्यानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून भाजी बाजाराचे ठिकाणी नागरीकांची होणारी गर्दी टाळणेसाठी साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
कोणतीही व्यक्ती/संस्था/सघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post