काेराेना विषाणू : नववर्षाच्या सुट्यांनंतर चीनचा शेअर बाजार आपटला




माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - काेराेना विषाणूमुळे लाेकांसाेबत चीनच्या अर्थव्यवस्थेला संसर्ग झाला आहे. चीनमध्ये नववर्षाच्या आठवडाभराच्या सुट्यांनंतर साेमवारी उघडलेला शेअर बाजार आपटला. काेराेना विषाणू संसर्गामुळे वाढलेल्या चिंतेमुळे शांघाय शेअर बाजार ७.७२ टक्के काेसळला. चीनच्या शेअर बाजारात चार वर्षांतील ही सर्वात माेठी घसरण आहे. शांघाय कंपाेझिट इंडेक्स २२९.९२ अंक म्हणजे, ७.७२% घटून २,७४६.६१ अंकांवर आणि शेन-झेन कंपाेझिट इंडेक्स ८.४१ टक्के म्हणजे १४७.८१ अंक काेसळून १,६०९ अंकांवर बंद झाला. काेराेना विषाणू पसरल्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेला हाेणाऱ्या नुकसानीसाेबत जागतिक पुरवठा साखळीला सर्वात जास्त नुकसान हाेत आहे. याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर हाेत आहे.


बाजारात गुंतवणूकदारांमध्ये याबाबत खूप भीती आहे. असे असले तरी चीनच्या नियामक बाजाराला स्थिर करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. रविवारी चीनच्या केंद्रीय बँकेने बाजारात १.२ ट्रिलियन युआन(१७३०० काेटी डाॅलर)ची अतिरिक्त रक्कम टाकण्याची घाेषणा केली. सुट्या सुरू हाेण्याआधी बाजार २३ जानेवारीला खुला झाला हाेता आणि त्या दिवशी शांघाय कंपाेेझिट इंडेक्स २.८ टक्के काेसळला हाेता. चीन सरकार २००८ मध्ये जागतिक मंदी आणि २००२-२००३ मध्ये सार्स आजाराच्या संसर्गानंतर बाजारातील उलथापालथ राेखण्यादरम्यान अशा प्रकारचे पाऊल उचलले आहे.



व्यावसायिक धारणेत सुधारणेचे संकेत

जानेवारीत नवी आॅर्डर मिळाल्याने उत्पादनासाठी खरेदी, उत्पादन, निर्यात आणि राेजगारात वाढ दिसली. यासाेबत व्यावसायिक धारणेत सुधारणा नाेंदली. जानेवारीत मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय उच्च स्तरावर असणे म्हणजे, मागणीत सुधारणा असते. यामुळे नवी आॅर्डर मिळणे, उत्पादन, निर्यात आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी खरेदी आणि राेजगारात वाढ दिसली. यासाेबत व्यावसायिक धारणेतही सुधारणा झाली. लिमा म्हणाल्या, जानेवारीत देशात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात बळकट वृद्धी नाेंदली आहे. यामुळे वातावरणात ज्याप्रमाणे सुधारणा दिसली, तसे गेल्या आठ वर्षांच्या अवधीत दिसले नाही.

नवीन आॅर्डरचा वेग ५ वर्षांत सर्वाधिक

कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, नवी आॅर्डर मिळाल्याने जी बळकटी आली ती गेल्या ५ वर्षांत दिसली नाही. हे मागणी वाढणे,ग्राहकांच्या गरजेच्या सुधारणेमुळे झाले.
निर्यात आॅर्डरमध्ये  २०१८ नंतर वाढ

कंपन्यांच्या एकूण विक्रीत विदेशी बाजारांत वाढलेली मागणी महत्त्वाची भूमिका ठरली. ही नाेव्हें. २०१८ नंतर निर्यातीच्या नव्या आॅर्डरमध्ये वेगवान वाढ आहे.

राेजगारात ७.५ वर्षांत वेगवान वृद्धी

जानेवारीमध्ये राेजगार वृद्धीतही सुधारणा दिसली. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात राेजगाराचा दर साडेसात वर्षांत सर्वात तेज राहिला आहे.

पतधाेरण आढाव्यावर उद्योग जगताचे लक्ष
उद्योग जगतास रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याची प्रतीक्षा आहे. यात मागणी वाढणे, आर्थिक वृद्धीच्या  मदतीसाठी उपाय होऊ शकतात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post